@maharashtracity

आंदोलनकर्ते डॉक्टर संभ्रमावस्थेत

मुंबई: सेट्रल लेबर इन्स्टिट्युटकडून (Central Labor Institute) सुरु करण्यात आलेल्या असोसिएट फेलो इन इंडिस्ट्रीयल हेल्थ (Associate Fellow in Industrial Health) या विषयाच्या कोर्ससाठी राज्य भरातून ८० डॉक्टरांनी प्रवेश घेतला आहे.

हा कोर्स ऑनलाईन घेतल्यास अधिक सयुक्तिक ठरेल या मागणीसाठी आज सायन ( Sion) येथील सेट्रल लेबर इन्स्टिट्युटसमोर हे ८० डॉक्टरांनी आंदोलन केले.

मात्र हा कोर्स ऑनलाईन केल्यास त्याला कायदेशीर मान्यता राहणार नाही असे उत्तर आंदोलनकर्त्यां डॉक्टरांना मिळाले. यावर तसे लिहून द्या असे आंदोलनकर्त्यां डॉक्टरांनी सांगितल्यावर नकार देण्यात आला.

त्यामुळे आंदोलनकर्ते असोसिएट फेलो इन इंडिस्ट्रीयल हेल्थ या विषयाच्या कोर्ससाठी राज्य भरातून ८० डॉक्टरांमध्ये अधिक गोंधळ वाढला आहे.

दरम्यान यावर भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नितू पाटील ( Bharatiya Janata Party Medical North Maharashtra Co-Coordinator Dr. Nitu Patil ) यांनी सांगितले की, डायरेक्टर जनरल फॅक्टरी अॅडव्हाईस सर्विस अॅण्ड लेबर इन्स्टिट्युटचे प्रमुख संचालक आर के इलगोवन (RK Elgovan, Director General, Factory Advisory Service and Director General, Institute of Labor) आहेत. तर हा कार्स सेंट्रल लेबर इन्स्टिट्युटव्दारे आयोजित करण्यात आला आहे.

याचे प्रमुख चौधरी असून यात चौधरी कुठेही निर्णय घेताना दिसून येत नाहीत. कोर्स ऑनलाईन असावा अशी मागणीचा मेल चौधरी यांना देखील करण्यात आला आहे.

दरम्यान आंदोलनकर्त्यांनी कायदेशीर पद्धतीने लढाई लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या गोंधळाची जबाबदारी कोणी अधिकारी घेण्यात तयार नसल्याचे कोर्स इच्छूक डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

ही बाब केंद्रीय राज्य मंत्री रामेश्वर तेली ( Union Minister of State Rameshwar Teli) यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचे डॉ. नितू पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here