@maharashtracity
धुळे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी भाजपचे खासदार डॉ.सुभाष भामरे (BJP MP Dr Subhash Bhamare) यांच्या घरासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, माजी आ. डी. एस. अहिरे, प्रा. शरद पाटील, प्रमोद सिसोदे, रमेश श्रीखंडे, अशोक सुडके, मुकेश खरात, साबिर शेख, बापू खैरनार, भानुदास पाटील, डॉ.अनिल पाटील, गायत्री जसस्वाल, विमल बेडसे, वानु शिरसाठ, छाया पवार, शाम भामरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्राची (Maharashtra) भूमी ही संपूर्ण देशाला व जगाला दिशा देणारी भूमी आहे आणि याच भूमीला बदनाम करण्याचे षडयंत्र हे देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेतृत्व करीत आहे. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने सातत्याने उत्तम कामगिरी केली असताना देखील भाजपाचे लोक हे खर्या अर्थाने देशद्रोही वृत्तीने वागताहेत.
कोरोना काळात अस्मानी संकट आले होते, तेव्हा देखील याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीत (CM Relief Fund) पैसे जमा करु नका, देशाच्या पीएम केअरमध्ये (PM- Care) जमा करा, असे भाजपने सांगितले होते. भाजपाचे षडयंत्र हे खर्या अर्थाने महाराष्ट्रविरोधी आहे. देशद्रोह्यालाही लाजीरवाने ठरेल, अशा प्रकारची भूमिका भाजपाने महाराष्ट्रात स्वीकारलेली आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेविरोधात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अपमानजनक वक्तव्य केलेले आहे, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने (Congress) राज्यभरात भाजपच्या खासदारांच्या घरासमोर जाऊन आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी धुळे जिल्हा काँग्रेसने भाजपचे खा. डॉ. भामरेंच्या घरासमोर निषेध आंदोलन केले.
महाराष्ट्रातील भाजपा नेते व देशाचे पंतप्रधान हे छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Mahararaj) भूमी असलेल्या महाराष्ट्राला वारंवार बदनाम करत असून त्यांनी माफी मागावी अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.