@maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ३,१०५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,५३,९६१ झाली आहे.

आज ३,१६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,७४,८९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३६,३७१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८९,१०,५६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५३,९६१ (११.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २,४२,११० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४२५

मुंबईत दिवसभरात ४२५ नव्या कोरोना रुग्णांची
(corona patients) नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४३४०८ एवढी झाली आहे. तर ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १६११६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here