@maharashtracity

मुंबईत तुलनेने १३१ रूग्ण वाढले

राज्यात ३,१८७ नवीन रुग्ण

मुंबई: मुंबईत बुधवारी दिवसभरात ५२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने किंचित चिंता वाढली. (Mumbai sees rise in corona patients) मंगळवारी हीच संख्या ३९४ इतकी होती. या तुलनेत गेल्या २४ तासात १३१ रुग्णांची भर पडली असल्याचे स्पष्ट झाले.

आतापर्यंत मुंबईत बाधित रुग्णांची संख्या ७४२५३२ एवढी झाली आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आता पर्यंत १६१०३ मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाच्या १८७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,४७,७९३ झाली आहे. काल ३,२५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण ३६,६७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात बुधवारी ४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८५,८४,८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७,७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here