@maharashtracity

दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर

मुंबई: मुंबईत (Mumbai) पालिका आरोग्य यंत्रणेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या (corona patients) मृत्यूचे प्रमाण आता थेट २ वर घसरले आहे. अर्थात मृत्यू एक अथवा दोन रुग्णांचा होणे हे वाईटच आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ९९४ एवढी नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या १ मे रोजी कोरोनामुळे ९० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद पालिकेकडे आहे. त्यामानाने गेल्या २४ तासात कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ही २ वर आल्याने पालिका यंत्रणा व मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

पालिकेकडून कोरोनाबाबत प्राप्त अहवालानुसार, गेल्या २४ तासात कोरोनाबाधित १९८ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ३९ हजार ७२४ एवढी नोंदविण्यात आली आहे. तसेच, गेल्या २४ तासात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख १८ हजार ६५८ एवढी नोंदविण्यात आली आहे. तर विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६४० एवढी आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या २४ तासांत पालिका आरोग्य यंत्रणेने कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी २८ हजार ५०८ चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत ८७ लाख ७ हजार २५४ चाचण्या करण्यात आल्याची नोंद आहे.

मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांचा दर ९७% एवढा आहे. १० ते १६ ऑगस्ट या कालावधीत कोविड वाढीचा दर ०.०४% एवढा आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा दर १ हजार ९८६ दिवस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here