@maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी १,९६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,४४,९१५ झाली आहे. आज ११,४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६६ % एवढे झाले आहे. (Recovery rate) राज्यात आज रोजी एकूण ३६,४४७ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात सोमवारी १२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात ८ ओमिक्रॉन बाधित

राज्यात सोमवारी ८ ओमिक्रॉन संसर्ग (omicron patients) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) यांनी रिपोर्ट केले आहेत. आठही ओमिक्रॉन बाधित मुंबईत (Mumbai) आढळले आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण ३९९४ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७५०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १२९७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत १९२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १९२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५३३२४ रुग्ण आढळले. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६८५ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here