@maharashtracity
धुळे: अतिवृष्टीचा सामना करणार्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केली आहे. (Amrish Patel demands wet drought be announced in Dhule & Nandurbar districts)
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अवकाळी आलेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) पिके, फळपिके, शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.
Also Read: महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”- आ. अतुल भातखळकर
अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर येऊन शेतजमिनीत पाणी साचले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती क्षेत्रात सततच्या पावसामुळे पाणी थांबल्याने पिके मुळासकट नष्ट झाली असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोरडवाहू, बागायती, वार्षिक बागायती पिकांना तसेच पशुधन, गोठा व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावी तसेच संपूर्ण वर्षाचे वीजबिल व पीक कर्ज माफ करावे (Farmers should get financial package) अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार, माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी शासनाकडे केली आहे.