@maharashtracity

मुंबई: राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या (Delta Plus Variant) नव्या १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या १० रुग्णांपैकी ६ रुग्ण कोल्हापूर, ३ रत्नागिरी, १ सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आहेत. मात्र हे दहाही रुग्ण कोविड (covid) आजारातून बरे झालेले आहेत. आतापर्यंत एकूण ७६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर डेल्टा प्लसमुळे ५ जणांचा मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान ७६ रुग्णांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ३ पुरुष आणि २ महिला आहेत. २ मृत्यू रत्नागिरीतील (Ratnagiri) आहेत तर, प्रत्येकी १ मृत्यू बीड (Beed), मुंबई (Mumbai) आणि रायगडमधील (Raigad) आहेत.

मृत्यू झालेले ५ ही रुग्ण ६५ वर्षांवरील असून त्या सर्वांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोघांनी कोव्हिशील्डचे दोन डोस घेतले होते. तर, दोघांनी कोणताही डोस घेतला नव्हता. तर एकाच्या लसीकरणाबाबत राज्याला माहिती उपलब्ध झालेली नाही.

या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. त्यानुसार, आतापर्यंत ७६ डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.

जिल्हानिहाय रुग्ण : जळगाव १३, रत्नागिरी १५, मुंबई ११, कोल्हापूर ७, ठाणे ६, पुणे ६ पालघर, रायगड प्रत्येकी ३, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग प्रत्येकी २, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड प्रत्येकी १ असे एकूण ७६ रूग्ण झाले आहेत.

सर्वाधिक ३९ डेल्टा प्लस रुग्ण हे १९ ते ४५ वयोगटातील आहेत. तर त्या खाली ४६ ते ६० वयोगटातील १९ रुग्ण आहेत. १८ वर्षाखालील ९ बालके असून ६० वर्षांवरील ९ रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७६ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३७ पुरुष असून ३९ स्त्रिया आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here