@maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) नव्याने सुरु केलेल्या कस्तुरबा रूग्णालयातील (Kasturba Hospital) जीनोम सिक्वेसिंग (Genome Sequencing) यंत्राद्वारे डेल्टा प्लस व्हेरिएन्टचे (Delta Plus Variant) दिवसाला ३०० नमुने तपासण्याची क्षमता असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी दिली. आगामी आठवड्यापासून चाचण्यांना सुरुवात होणार असल्याचे ही डॉ. गोमारे म्हणाल्या.

अमेरिकेतून (USA) आणलेली ही मशीन ६ कोटी रुपयांची आहे. यातून एका नमुना चाचणीसाठी १० ते १२ हजार रुपये खर्च येणार असला तरी महापालिका या चाचण्या मोफत करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. तसेच डेल्टा प्लसच्या सर्व नमुन्यांच्या चाचण्या होणार नसून निवडक होतील आणि फक्त ४ दिवसात निदान होणार असल्याचे डॉ मंगला गोमारे म्हणाल्या.

मुंबईत आतापर्यंत डेल्टा प्लसचे ६०० संशयित रुग्ण असून काही रुग्णांना वेगळी लक्षणे आढळतात. असे संशयित नमुने डेल्टा प्लसच्या तपासणीसाठी पाठवले जातात. तसेच काही जणांना दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला आहे. अशांचे स्टॅब सॅम्पलची चाचणीही या डेल्टा प्लस मशीनमध्ये केली जाणार आहे.

या चाचणीतून म्युटंटच्या प्रकराचे निदान होऊन त्यानुसार उपचार केले जातील असे सांगण्यात आले. त्यामुळे डेल्टा प्लसचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवणे बंद करण्यात आले असून शेवटचे नमुने १५ दिवसांपूर्वी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

दर आठवड्याला २० ते २५ डेल्टा प्लसचे नमुने पुण्याच्या एनआययव्ही प्रयोगशाळेत (NIV lab, Pune) तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here