@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेतील (BMC) भाजपच्या नगरसेवकांनी (BJP Corporators) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिका , वैधानिक समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घेण्यात याव्यात, या मागणीसाठी गुरुवारी पार पडलेल्या ऑनलाईन पालिका सभेत फलकबाजी, घोषणाबाजी करीत प्रचंड गदारोळ घातला व तीव्र निदर्शने केली. (BJP corporators demand offline meetings)
भाजप नगरसेवकांनी ऑनलाइन सभेत ‘काळ्या रंगाचे फलक फडकवले. तसेच, के/पूर्व आणि सी-डी प्रभाग समितीच्या बैठकीत गदारोळ घातला. भाजपने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या दालनासमोर पालिका सभा प्रत्यक्ष घेण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने केली होती. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनाही आक्रमक झाली होती.
मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने आता पालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती आदी वैधानिक, विशेष समित्यांच्या बैठका या ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष घेण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी केली आहे.
या ऑनलाईन बैठकीच्या नावाखाली सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) भ्रष्टाचार करीत असून त्याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न भाजपने केला तर आमच्या सदस्यांना बोलू दिले जात नाही, अशी तक्रार भाजपतर्फे करण्यात येत आहे.