@maharashtracity

परदेश शिष्यवृत्ती: १०० % विद्यार्थ्यांना दिले मंजुरी आदेश
मंत्री धनंजय मुंडे यांच्याप्रति विद्यार्थी कृतज्ञ!

मुंबई /पुणे: सर माझे वडील मजुरी करतात. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अमेरिकेत (USA) शिक्षणासाठी जाईल. आज ते समाज कल्याण विभागाच्या (Social Justice Department) शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन शक्य झालं आहे, यावर विश्वासच बसत नाही. सामाजिक न्याय मंत्री धनु भाऊ यांनी ही प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबवली, त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत! ही भावना आहे, लंडन येथील (The University of Edinburgh) मध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग (Manual Scavenging) याविषयाचे संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या भंडाऱ्याची शिवानी वालेकर या विद्यार्थीनीची.

“सर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एका खेडेगावात गाई-म्हशींचे पालन-पोषण करून शेण-मातीचे कामाबरोबरच पडेल ते काम केले. अदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने पाण्यासाठी १/२ किलोमीटर रोजची वणवण. अशा परिस्थितीत कुटूंबाच्या उदर्निर्वाहासाठी प्रयत्न करत शिक्षण सोडले नाही. समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृतीच्या पुण्याईमुळेच वाडीव-हे, जिल्हा नाशिक (Nashik) ते वाशिंग्टन (Washington, D.C.) हा माझा प्रवास हजारो विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरल्यास जीवनाचे सार्थक होईल,” अशी भावुक प्रतिकिया होती, नाशिकच्या चारुदत्त म्हसदे यांची.

एम.टेक झालेले चारुदत्त यांची अमेरिकेच्या न्युयार्क विद्यापीठात (New York University) मानवी शरिरातील विविध भागासाठी लागणा-या उपकरणाचा शोध व त्यात सुधारणा या विषयावर संशोधनासाठी निवड झाली आहे.

आजही अमरावतीच्या (Amravati) भीमनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विकासाचे जिवन म्हणजे म्हणतात ना बारा विश्व दारिद्र्य, अशा परिस्थितीत वडीलांना चहा टपरी चालवण्यास मदत करुन शिक्षण पुर्ण केले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr Babasaheb Ambedkar) शिक्षण घेतलेल्या लंडनच्या केंब्रिज विद्यापीठाच्या (Cambridge University, London) व बाबासाहेबांचे गुरु असलेले जॉन डुई हे संस्थापक असलेल्या टीचर्स कॉलेजमध्ये जगातील शिक्षण पध्दतीवर संशोधन करण्यासाठी निवड झालेल्या अमरावतीच्या विकास तातड या विद्यार्थ्यांची भावना तर नक्कीच डोळ्यात पाणी आणते.

असे एक नाही तर अनेक विषयात प्राविण्य मिळविलेले सर्वसामान्य कूटुंबातील विद्यार्थी आपल्या भावना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे व्यक्त करत होते. सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा अनोखा कार्यक्रम रात्री उशिरापर्यत चालु होता.

निमित्त होते सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात निवड झालेल्या ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आल्याचे आणि त्यांचे मूळ कागदपत्रे तपासणी व त्यांना अंतिम मंजुरी आदेश देण्याबाबत दिनांक २० ऑगस्ट रोजी आयुक्तालयात आयोजित केलेल्या शिबीराचे!

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या योजनांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आल्याने प्रथमच या योजनेचा १०० % कोटा पुर्ण होत आहे. त्यातूनच गेल्या दहा वर्षातील रेकॉर्डब्रेक कामगिरी या वर्षी झाली आहे.

तसे बघितले तर देशात परदेश शिष्यवृत्ती योजनेबाबत विभागाची सर्वोत्तम कामगिरी झाली असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण अवघ्या काही दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्धी करणे पासून अर्ज स्वीकारणे, तपासणे, तुटीच्या अर्जाची पूर्तता करून घेणे, गृह चौकशी करणे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे आदी बाबी पूर्ण करण्यात आल्या.

तसेच कोविडची परिस्थिती विचारात घेता विद्यार्थाच्या मागणीनुसार वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. राज्यात व देशात कोरोनाचे संकट गंभीर, तरीही कमी दिवसाच्या कालावधीमध्ये व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विभागाने रात्रीचा दिवस करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करून अंतिम मजुंरी आदेश दिले आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये अशा पद्धतीने शिष्यवृत्ती दिली जात असली तरी सर्वांत आधी व तितक्याच वेगाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केलेली कामगिरी ही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा असुन निश्चितच सुखावह ठरली आहे. या कामागिरीमुळे विद्यार्थीदेखील आश्चर्य व उत्साही झाले आहेत.

दरवर्षी असंख्य विद्यार्थी परदेशात जात असले तरी त्यात सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी प्रथमच शिष्यवृती योजनेमुळे जात असल्याने व इतरही बरिच प्रक्रिया करावी लागत असल्याने ते निश्चितच तणावात असतात. त्यामुळेच त्याचा ताण कमी झाल्याने विद्यार्थी समाधान व कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

ना. धनंजय मुंडे यांच्या गतीशील निर्णयामुळे तसेच विभागाने यावर्षाची योजना धडाक्यात मार्गी लावली. त्यामुळे शासनाचे काम आणि चार हात लांब अशी जी म्हण प्रचलित आहे, या म्हणीला छेद देण्याचे काम सामाजिक न्याय विभागाने केले असून ना. धनंजय मुंडे यांचे सर्वच विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

कागदपत्र तपासणी व छानणीकामी समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त भारत केंद्रे , प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड, सहाय्यक आयुक्त विद्यानंद चल्लावार, सहाय्यक आयुक्त संगीता डाखकर, सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, यांच्यासह विभागाच्या शिक्षण शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले. त्यासर्वाचे पालकानी धन्यवाद व्यक्त केले.

“राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात सुधारणा केल्याने २००३ नंतर प्रथमच योजनेचा कोटा १००% पूर्ण झाला. गरजू विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळाली याचे समाधान आहे. एकूण लाभार्थी संख्या ७५ वरून २०० करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. आपले भविष्य घडवण्यासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकायला निघालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!”

  • ना. धनंजय मुंडे
    (मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here