@maharashtracity

धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (Dhule Municipal Corporation) स्थायी समितीने मंजुर केलेला सन 2022-2023 चा 586 कोटी 99 लक्ष रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी सभापती शीतलकुमार नवले यांनी अंतिम मंजुरीसाठी महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradip Karpe) यांच्याकडे सुपूर्द केला. या अर्थसंकल्पाला (budget) मंजुरी देण्यासाठी पुढील आठवड्यात महासभा होण्याची शक्यता आहे.

धुळे महापालिका (DMC) प्रशासनाने स्थायी समितीला 586 कोटी 99 लक्ष 46 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात कुठल्याही प्रकारची दरवाढ, करवाढ न करता स्थायी समितीने उत्पन्नात सहा कोटी 55 लक्ष रुपयांची वाढ सुचविलेली आहे. तसेच 53 कोटी सहा लक्ष रुपयांच्या वाढीव तरतुदी सुचविल्या आहेत.

त्याअनुषंगाने महिला व बालकल्याण, अपंग कल्याण व मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक या बाबींमध्ये नियमाप्रमाणे वाढ समाविष्ट करण्यात आलेली आहे. यानुसार पाच कोटी 55 लक्ष सात हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प (Surplus budget) अंतिम मंजुरीसाठी गुरुवारी स्थायी समिती सभापती शीतलकुमार नवले यांनी महापौर प्रदीप कर्पे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थायी समिती सदस्य हर्षकुमार रेलन, किरण अहिरराव, बन्सीलाल जाधव, प्रतिभा चौधरी, नगरसेवक दगडू बागुल, नगर सचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here