आमदारांसह कार्यकर्त्यांचा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना घेराव

धुळे: गेल्या काही दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात वीजेचा लपंडाव (power cut) डाव सुरु असून गणेशोत्सव (Ganeshotsav) काळातही वीजेची समस्या कायम होती. यामुळे संतप्त झालेले धुळे शहराचे आमदार फारुक शहा (MIM MLA Faruk Shah) यांनी गुरुवारी वीज कंपनीच्या कार्यालयात धडक देऊन अधीक्षक अभियंत्यांना घेराव (Gherao) घातला. शिवाय, तातडीने वीजेची समस्या सोडविली नाहीतर अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासेल, त्यांना खुर्चीला बांधून ठेऊ, असा सज्जड इशाराही दिला.

या आंदोलनात आ.फारुक शहा यांच्यासमवेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सलीम शहा, नगरसेवक नासीर पठाण, सईद बेग मिर्झा, गनी डॉलर, शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी, महिला जिल्हाध्यक्षा डॉ.दीपाली नाईक, फातेमा अन्सारी, शकीला शेख, साहीदा अन्सारी, रिझवाना सय्यद, अकीला सय्यद, निजाम सय्यद, आसिफ शहा, माझीद पठाण आदी कार्यकर्त सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून शहरात रात्री बेरात्री आणि दिवसा वीजेचा लपंडाव सुरु आहे. सणासुदीच्या काळातही ही समस्या कायम आहे. रमजान ईद, गणेशोत्सव काळातही वीजेचा लपंडाव थांबलेला नव्हता. सततच्या वीजेच्या लपंडावामुळे जनता हैराण झाली आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आमदार शहा यांच्याकडे आल्यात. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी आ.फारुक शहा यांनी कार्यकर्त्यांसह साक्रीरोडवरील वीज कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी अधिक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.

याआधी देखील आ.शहा यांनी दोनवेळा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. पंरतू, अजूनही वीज कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली नाही. जर येत्या 24 तासात शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिक्षक अभियंता तगलपल्लेवार यांना काळे फासून खुर्चीला बांधून ठेऊ, असा सज्जड इशारा आ. शहा यांनी दिला. यानंतर तगलपल्लेवार यांनी समस्या सोडविण्याची ग्वाही देत कामचुकार अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here