राज्यभरातून 76 कोटीत फसवणूकीचा संशय

सुरतमधील चौघांसह सहा जणांविरुध्द गुन्हा

दोघे अटकेत

@maharashtracity

धुळे: आकर्षक व्याजदराचे आमीष दाखवून राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांची सुमारे 76 कोटी रुपयांत फसवणूक झाल्याची प्राथमिक माहीती आहे. केवळ धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीनच जिल्ह्यातून चार हजार 440 गुंतवणूकदारांकडून सुमारे 56 कोटी रुपये गोळा झाले आहेत. यामुळे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक झाली असून सुरतमधील चार आणि दोंडाईचामधील दोन, अशा सहा जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहीतीनुसार, प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना, धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल सर्व रा.सुरत यांनी शुकूल वेल्थ अ‍ॅडव्हाजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाऊंडर, डेलीगेट या फर्मची स्थापना केली. त्या माध्यमातून मंगेश नारायण पाटील, आकाश मंगेश पाटील, दोघे रा. जयहिंद कॉलनी, दोंडाईचा या स्थानिक प्रतिनीधींनी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले. वरील सहा जणांनी वेळोवेळी जाहिरात करून फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास प्रति महिना आठ ते नऊ टक्के दराने आकर्षक परतावे मिळतील, असे आमिष देवून ठेवीदारांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले.

हा प्रकार 2019 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरु होता. राज्यभरातून सुमारे 76 कोटी रुपये गोळा झाल्याची प्राथमिक माहीती आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीनच जिल्ह्यातून चार हजार 440 गुंतवणूकदारांची फसवणूक करुन सुमारे 56 कोटी रुपये गोळा झाले आहेत. यामुळे फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तूर्तास, यात दोंडाईचामधील गुंतवणुकदारांची तब्बल एक कोटी 40 लाख 50 हजार 508 रूपयात फसवणूक झाल्याची माहीती मिळाल्याने गुंतवणूकदार रविंद्र निंबा नेरकर (42, रा. राणीपुरा, दोंडाईचा) यांच्या तक्रारीवरून वरील सहा ठगांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक विजय जाधव, सहाय्यक निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिरअसई हिरालाल ठाकरे, नितीन चव्हाण यांनी स्थनिक प्रतिनीधी मंगेश पाटील, आकाश पाटील यांना दोंडाईचा व सुरत येथून अटक झाली. त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. पाटील यांना दोंडाईचा व सुरत येथून अटक झाली. त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here