आणखी काही तक्रारदार आले पुढे,

अन्य पतसंस्थांमधील लाँकरची तपासणी करणार!

@maharashtracity

धुळे: कथीत सावकार राजेंद्र बंबच्या पोलीस कोठडीत सोमवारी न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली. यामुळे त्याला 11 जूनपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे. शिवाय, आणखी दोन लोकांनी बंबविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) तक्रार दिल्याने बंबच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने बंबच्या (Private money lender Rajendra Bamb) घरातून आणि बँकांमधील लॉकरमधून आतापर्यंत एकूण दहा कोटी 73 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड जप्त केली आहे. बंबच्या अन्य बँका व पतसंस्थांमधील लाँकरची तपासणी करणे अजून बाकी असल्याने त्यातून किती घबाड हाती लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जयेश दुसाणे रा.धुळे या तरुणाने कथीत सावकार तथा एलआयसी एजंट (LIC Agent) राजेंद्र बंबविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे अवैध सावकारीची तक्रार दिली होती. यानंतर पोलीस उपअधीक्षक ईश्‍वर कातकाडे यांच्या नेतृत्वातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांच्यासह पथकाने बंबच्या घरात आणि त्याच्या बँकांच्या लॉकरची झाडझडती घेतली. यातून मोठे घबाड पथकाच्या हाती लागले.

बंबच्या घरातून आणि त्याच्याच वेगवेगळ्या बँकांच्या लॉकरमधून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 5 कोटी 13 लाख रुपयांची रोकड, 7 किलो 621 ग्रॅम चांदी, 3 किलो 579 ग्रॅम सोने, त्यात 67 सोन्याची बिस्कीट, एक किलो सोन्याचे कटवरी टोल, असा एकूण 15 कोटी 21 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. शिवाय, लॉकरमध्ये 58 विदेशी चलनही आढळून आले.

साधा एलआयसी एजंट असलेल्या एका कथीत सावकाराकडे इतकी अवैध संपत्ती मिळून आल्याने पथकातील कर्मचारीही चक्रावले. पोलिसांनी बंबची सहा दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती. ती कोठडी सोमवारी संपली. यामुळे बंबला सोमवारी पुन्हा धुळे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने बंबला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here