@maharashtracity

धुळे: आठ वर्ष होऊनही अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ.नरेंद्र दाभोळकर (Dr Narendra Dabholkar) यांच्या खूनाचा तपास अपूर्ण असल्याबद्दल अंधश्रध्दा निर्मूलन समितीने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तपासाला गती देत या खूनामध्ये सहभागी असलेल्या मुख्य सुत्रधाराला शोधून काढावे, या मागणीसाठी अंनिसने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.

याबाबत अंनिसच्या धुळे शाखेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डॉ.दाभोळकर यांच्या खूनाला येत्या २० ऑगस्ट रोजी ८ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या खुनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. एका परिवर्तनवादी समाज सुधारकाचा आणि त्यापाठोपाठ कॉ.गोविंद पानसरे (Com Govind Pansare), प्रा.कलबुर्गी (Prof Kalburgi), गौरी लंकेश (Gauri Lankesh) अशा अनेक परिवर्तनवाद्यांचा खून होणे हे अतिशय काळीमा फासणारी बाब आहे.

त्यापेेक्षाही गंभीर म्हणजे या खुनांचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शासन प्रशासन आणि सरकार यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍न निर्माण होतो. या खूनांचा तपास लावून लवकर मुख्य सुत्रधार शोधावा, अशी मागणी अनिसचे दिलीप खिवसरा, नवल ठाकरे, डॉ.सुरेश बिर्‍हाडे, अ‍ॅड.देसले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here