मुंबईत ११,६४७ हजार रुग्ण

मुंबई: मुंबईत सोमवारी सुमारे १३ हजार कोरोना रुग्ण आढळले होते, तर मंगळवारी ११,६४७ रुग्ण आढळले. त्यामुळे दररोज होणारी रुग्णवाढ काही प्रमाणात घटली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून सतत हजारोच्या संख्येने रुग्ण घट सुरु असल्याचे आकडेवारी वरून समोर येत आहे.

मुंबईत (Mumbai) आजची एकूण कोरोना रुग्णसंख्या (corona patients) ९,३९,८६७ झाली असून आज १४,९८० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ८,२०,३१३ झाली आहे. एकीकडे रूग्ण संख्या घटत असताना आज दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १६,४१३ आहे.

मुंबईत सध्या १,००,५२३ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के असून कोविड रुग्णवाढीचा दर १.८७ टक्के असा आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी (doubling rate) ३६ दिवस असा आहे.

आजच्या चाचण्या ६२,०९७ झाल्या असून आतापर्यंतच्या एकूण चाचण्या १,४३,२५,१४४ एवढया झाल्या आहेत. रूग्ण संख्या आता घटू लागल्याने मुंबईत कोरोना उतरणीला लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईकरासाठी हे दिलासादायक चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here