आर्थिक विकास पाहणी अहवालात वर्तवला अंदाज
@maharashtracity
मुंबई: राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (Economic Surve report) आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. या अहवालात राज्याचा आर्थिक वाढीचा दर १२.१ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आर्थिक अहवालातील माहितीनुसार, यंदा राज्याच्या आर्थिक विकासाचा दर १२.१ टक्के राहण्याचा अंदाज तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. ही वाढ २०२१-२२ मधील घटीच्या पार्श्वभूमीवर आहे. यामध्ये सर्वात कमी ४.४ टक्के वाढ कृषी व संलग्न कार्यांसाठी अपेक्षित आहे. तर उद्योग क्षेत्रात ११.९ टक्के, सेवा क्षेत्रात सर्वाधिक १३.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच वस्तुनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रात अनुक्रमे ९.५ टक्के आणि १७.४ टक्के अहवाल अपेक्षित आहे.
राज्याचे स्थूल उत्पन्न ३१,९७,७८२ कोटी रुपये अपेक्षित आहे. तर वास्तविक स्थूल उत्पन्न २१,१८,३०९ कोटी रुपये राहणे अपेक्षित आहे. सांकेतिक स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक १४.२ टक्के आहे. तर सन २०२१-२२ च्या पूर्वानुमानानुसार राज्याचे दरडोई उत्पन्न २,२५,०७३ रुपये राहणे अपेक्षित आहे.