रुग्णालयांमध्ये जंबो पद्धतीने बेड्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनही

मुंबई: कोविडवर ( Corona) उपचार करण्यासाठी त्वरेने उघडलेल्या जंबो कोविड केंद्रांमध्ये ( Jumbo covid centres) सुसज्ज बेड, व्हेंटिलेटर ( ventilators) , अद्ययावत क्ष-किरण मशिन यांसारख्या दर्जेदार अत्यावश्यक सेवा देण्यात आल्या. यामुळे कोविड रुग्णांचे प्राण वाचले. कोविड केंद्रांमधील यासेवा सर्व पालिका रुग्णालयात ( BMC) हलविण्यात येणार असल्याचे संकेत पालिकेकडून मिळत आहेत.

याच वैद्यकीय उपकरणांचा वापर करून लवकरच महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये आणि ४ प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील ( Medical Colleges) रुग्णांवर उपचार केले जाणार असे पालिकेच्या एका अधिकाऱ्यांकडून समजत आहे.

दरम्यान कोरोना सुरु झाला त्यावेळी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता आणि रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेतील अन्य उपकरणांच्या कमतरतेमुळे रुग्णालयीन कर्मचारीच तक्रार करू लागले होते. ही कमतरता ओळखून पालिकेने वरळी (warli), बीकेसी (BKC) , गोरेगाव (Goregoan) , मुलुंड (Mulund) , दहिसर (Dahisar) येथे युद्धपातळीवर जंबो कोविड केअर सेंटर उभारले. या कोविड केंद्रांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले.

अनेक जण जीवघेण्या आजारापासून वाचले. तिसऱ्या लाटेचा ( Third wave) सामना करण्यासाठी काही केंद्रेही बांधण्यात आली होती. सध्या मुंबईत एकूण ११ जंबो कोविड केंद्रे रुग्णांसाठी सज्ज आहेत, मात्र कोविड आता नियंत्रणात आला आहे. मुंबईत दररोज ५०० पेक्षा कमी रुग्ण येतात, त्यापैकी केवळ २५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असते.

अशास्थितीत डिसेंबरनंतर काही केंद्रे बंद करण्याचा विचार महापालिका करत आहे. केंद्रे बंद राहिल्यास त्या केंद्रातील खाटा, व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणे पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांना आणि प्रमुख रुग्णालयांना दिली जातील, जेणेकरून कोविड नसलेल्या रुग्णांवर उपचार करता येतील.

२०२२ पर्यंत महापालिकेची २ ते ३ रुग्णालये तयार होतील, अशा परिस्थितीत आम्ही जंबो कोविड केंद्रातील वैद्यकीय उपकरणे आणि बेड्स तेथे हलवू, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Municipal Commissioner Suresh Kakani ) यांनी सांगितले. तसेच मुंबईतील एकूण ११ जंबो कोविड केंद्रांमध्ये सुमारे १०००० खाटा उपलब्ध आहेत.

याशिवाय ४०० व्हेंटिलेटर, ४० डायलिसिस मशीन (Dialysis machine ) आणि ५० एक्स-रे मशीन ( X-Ray Machine) उपलब्ध आहेत. ही संख्या खूप मोठी आहे आणि कोविडनंतर त्याचा वापर नॉन-कोविड रूग्णांच्या उपचारांसाठी होईल.

याशिवाय उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट ( Oxygen Plant) उभारण्याचा विचार असल्याचे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले. दरम्यान जंबोमधील उपकरणे उपनगरीय रुग्णालयांना दिल्यास रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरेल आणि त्यांना सायन (Sion hospital) , केईएम ( KEM) , नायर ( Nair) आणि कूपर (Cooper) यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

त्यातून रुग्णांचा ओढा वाढणार नाही. काही प्रमाणात रुग्णालयांवरील भारही कमी होईल असे मुलुंड जम्बो कोविड सेंटर प्रमुख डॉ. प्रदीप आंग्रे (Mulund Jumbo Covid Center Head Dr. Pradeep Angre) यांनी सांगितले.

मुंबईत कोविड रुग्ण असून आढळलेल्या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांना रुग्णालयाची गरज आहे. पालिकेची जंबो कोविड केंद्रे रिक्त आहेत. डिसेंबरपर्यंत कोविडची प्रकरणे वाढली नाहीत, तर काही केंद्रे बंद होतील. आणि तेथे उपलब्ध असलेली वैद्यकीय उपकरणे रुग्णालयांमध्ये हलवली जातील.

  • सुरेश काकाणी, आयुक्त, अतिरिक्त महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here