छबिना उत्सवात नोटा वितरण झाल्याचा संशय

महाड: महाड (Mahad) शहरातील दोन दुकानांत एकाच नंबरच्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा सापडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या छबिना उत्सवात बनावट नोटांचा (fake currency) वापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव नुकताच साजरा झाला. यासाठी लाखो भाविक महाडमध्ये आले होते. शिवाय परभणी (Parbhani) जिल्ह्यातून आणि परराज्यातून विविध खेळण्यांची दुकाने देखील आली होती. याच दरम्यान गर्दीचा फायदा उठवत कोणीतरी बनावट नोटा वितरित केल्या असाव्यात असा संशय व्यक्त होत आहे.

येथील एका हॉटेल व्यावसायिकाकडे पाचशे रुपयाची आलेली नोट बनावट असल्याचा संशय आल्याने तो समोरच असलेल्या एका पान टपरीवर ती नोट दाखवण्यास गेला असता पान – टपरी वाल्याकडे देखील अशाच प्रकारची नोट असल्याचे त्याने सांगितले. या दोघांनी नोटेचा नंबर तपासला असता एकच असल्याचे दिसून आले. या नोटेवरील क्रमांक 4DR 080709 असा असून ही नोट मोजणी यंत्रमध्ये टाकली असता यंत्राने देखील बनावट असल्याचा संदेश दिला.

छबिना उत्सवातील गर्दीचा फायदा कोणीतरी अज्ञात इसमाने घेऊन बनावट नोटा वापर केल्याचे संशय व्यक्त होत आहे. यामुळे महाड बाजारपेठेत आणखी नोटा वितरित झाल्या असण्याचा संशय व्यक्त होत आहे. वरील नंबरची नोट आढळून आल्यास तिची खात्री करावी, असे आवाहन बँकांकडून (bank) करण्यात आले आहे.

“ग्राहकांनी किंवा नागरिकांनी आपल्याकडील नोट प्राथमिक तपासानुसार तपासून घ्यावी. शिवाय अधिकाधिक डिजिटल देवाण-घेवाणीचा उपयोग करून अशा प्रकारच्या नकली नोटापासून मुक्ती मिळवता येईल.”

  • किसलय कुमार, शाखा अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here