@maharashtracity

धुळे: धुळे तालुक्यातील नगांव गटात विजयी झालेले भाजप उमेदवार राम भदाणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर मिरवणुक काढण्यासह एका महिलेने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे गुन्हे खोटे असून, ते मागे घ्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाकडे केली. (BJP demands to withdraw cases against party workers and winner.)

याच मागणीसाठी नगाव गावातील नागरिकांनी पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले.

या संदर्भात पोलीस अधिक्षक प्रविण पाटील यांची भेट घेत निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे आ.जयकुमार रावल (MLA Jay Kumar Rawal), माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradip Karpe), सुभाष देवरे, उपमहापौर भगवान गवळी, जि.प.अध्यक्ष तुषार रंधे, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, मनोहर भदाणे, हिरामण गवळी आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नगांव जिल्हा परिषद गटातून राघवेंद्र उर्फ राम मनोहर भदाणे यांचा विजय झाला. हा विजय काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress – NCP) नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे नेते सत्तेचा गैरवापर करून पराभवाला सामोरे न जाता, कार्यकर्त्यांमध्ये भांडण लाऊन, खोटे-नाटे आरोप करून धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत.

हा प्रकार धुळे तालुक्यात सुध्दा सुरू आहे. अशा सुड बुध्दीचे राजकारण करणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दबावाला बळी न पडता प्रशासनाने शहानिशा करूनच गुन्हे दाखल करावेत व भाजपच्या पदाधिकार्‍यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भाजप जिल्हाभरात मोठे आंदोलन छेडेल, असा इशारा भाजपने दिला आहे. (BJP threatened to hold protest)

दरम्यान, या संदर्भात तपास सुरु आहे. तपासात जे काही पुरावे आढळून येतील ते तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here