@maharashtracity

मुंबई: कांजूरमार्ग (पूर्व) येथील सॅमसंग सर्विस सेंटरमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

प्राप्त माहितीनुसार, कांजूरमार्ग ( पूर्व), पोलीस स्टेशनजवळ, अँपेक्स कंपनी येथील सॅमसंग सर्विस सेंटरमध्ये (Samsung service center) रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

मात्र आग हळूहळू वाढत गेल्याने अग्निशमन दलाने रात्री ९.२५ वाजताच्या सुमारास ही आग स्तर -२ ची तर रात्री १०.१८ वाजेच्या सुमारास स्तर -३ ची आग झाल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाकडून (Fire brigade) ८ फायर इंजिन व ४ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

या आगीत सॅमसंग सर्विस सेंटरचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र आग का कशी लागली, त्याची कारणे काय, वित्तीय हानी किती प्रमाणात झाली, याबाबत अग्निशमन दल, स्थानिक पोलीस तपास करीत असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here