@maharashtra.city

मुंबई: मुंबईत रविवारपासून मुसळधार पावसाची धुमशान सुरू आहे. कुठे दरड कोसळणे, घरे, इमारती, झाडे यांची पडझड तर कुठे आगीच्या घटना घडत आहेत. पवई, हिरानंदानी संकुल येथील हायको सुपरमार्केटमध्ये (supermarket) गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी सुपरमार्केट बंद होते. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

प्राप्त माहितीनुसार, पवई, हिरानंदानी संकुल (Powai Hiranandani) येथे तळमजला अधिक पाच मजली ‘हायको सुपारमार्केट’ आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हे मार्केट बंद असताना या मार्केटच्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरून अचानकपणे धूर येऊ लागला. त्यानंतर मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

कोणीतरी तात्काळ अग्निशमन दलाला आगीबाबत माहिती देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी घेऊन आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. मात्र अवघ्या एका तासातच म्हणजे सकाळी ७.०५ वाजताच्या सुमारास आग भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने ही आग ‘स्तर -२’ ची असल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाची यंत्रणा अपुरी पडू लागल्याने आणखीन यंत्रणा मागवून घेण्यात आली. अग्निशमन दलाकडून (fire brigade) ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आगीवर ११.१८ वाजेच्या सुमारास नियंत्रण मिळवले. या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र सुपरमार्केटसमोर आग बघण्यासाठी बघ्यांची काहीशी गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीस पालिका वार्ड कार्यलयाचे ५ कामगार उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here