@maharashtracity

फायर कॉलची संख्याही १४०

मुंबई: मुंबईत दिवाळीच्या ५ दिवसांत ५८ ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या तुलनेत २०२० मध्ये दिवाळीत (Diwali) फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या ३५ घटना घडल्या तर २०१९ मध्ये ४७ घटना घडल्या आहेत. (Fire incidents due to crackers)

त्यामुळे गेल्या २ वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटनांत वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच, मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी झोपडपट्टी भागात रस्त्यांवर, पदपथावर, चौकात फटाक्यांचे छोटे, मोठे स्टॉल लावण्यात आल्याचे व त्या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचेही निदर्शनास येत आहे.

बहुदा अशाच काही बाबींमुळे आगी लागल्या असण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.

Also Read: महिलांसाठी ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बसगाड्यांचे लोकार्पण

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव (corona pandemic) सुरू झाला होता. पहिली लाट धडकली होती. मात्र २०२० मध्ये दिवाळीत आवाजी फटाक्यांवर बंदी घातल्याने फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या केवळ ३५ घटना घडल्या होत्या.

मात्र, यंदा कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत जरा जास्तच मोकळीक मिळाल्याने गर्दी वाढली, फटाक्यांची आतिषबाजी वाढली आणि फटाक्यांमुळे आगीच्या घटनांतही काहीशी वाढ झाली.

दिनांक १ ते ५ नोव्हेंबर या ५ दिवसांत फटाक्यांमुळे आग लागण्याचे ५८ काॅल आले. तर अन्य कारणांमुळे आग लागण्याचे तब्बल १४० काॅल आल्याचे मुंबई अग्निशमन (Mumbai fire brigade) दलातील सूत्रांनी सांगितले.

सुदैवाने, आगीच्या घटनांत कोणीही जखमी अथवा मृत झाल्याचे वृत्त नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here