@maharashtracity

केपटाऊनहून आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनहून शहरातून डोंबिवलीत दाखल झालेला युवक मुंबईत दाखल होताच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्याचे स्वाब नमुने सोमवारी कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच त्याला ओमिक्रोन या नवीन व्हेरियंटची लागण झाली आहे की नियमित कोरोना आहे हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, हा तरुण डोंबिवलीत दाखल होताच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्याला कल्याणमधील आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करुन घेतले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रोन (omicron variant) हा नवीन व्हेरियंट आढळून आला असतांना दक्षिण आफ्रिकेतून २४ नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आलेल्या एका ३२ वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

कस्तुरबा रुग्णालयाच्या अहवालानंतर त्याला लागण झालेला कोरोना नवा व्हेरियंट आहे का हे स्पष्ट होईल, अशी माहीती केडीएमसीच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

यां तरुणाने केपटाऊन (Cape Town), दुबई (Dubai), दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai) असा प्रवास केला आहे. दिल्लीत याची कोरोना चाचणी केली अहवाल निगेटिव्ह आला. परंतु मुंबईला दाखल होताच त्याची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली, तेव्हा त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.

केडीएमसीच्या (KDMC) वैद्यकीय आरोग्य विभागाला याची माहीती कोरोना चाचणी (corona test) केंद्रातून कळविण्यात आली. त्यावरुन कोरोनाबाधित संबंधित व्यक्तीला तातडीने कल्याण लालचौकी येथील कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here