@maharashtracity

मंगळवारी राज्यात ३४ मृत्यूची नोंद

मुंबई: राज्यात कोविड मृत्यू नियंत्रणात येत असल्याचे चित्र असले तरीही प्रत्यक्षात यात चढ-उतार असल्याचे दिसून येते.

मंगळवारी राज्यात ३४ कोविड मृत्यूची नोंद करण्यात आली. तर आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी १९ रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच रविवारी ४९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. यावरुन गेल्या तीन दिवसात मोठ्या फरकाने कोविड मृत्यू (covid death) नोंद होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, मंगळवारी कोल्हापूर (Kolhapur) तसेच नागपूर (Nagpur) मंडळात एकाही मृत्यूची नोंद नसून ठाणे १५, नाशिक २, पुणे १३, औरंगाबद २, लातूर १, अकोला १ असे मृत्यू नोंदवले गेले.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर असून मृत्यू संख्या अजूनही कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. शिवाय लसीकरणामुळे (vaccination) संसर्गित होण्याची संख्या घटत असून बरे होण्याची प्रमाण देखील वाढत आहे.

मंगळवारी ९४८ कोरोनाबाधित रुग्ण (corona patient) बरे झाल्याने राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६४,६९,७३९ एवढी झाली आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६४ टक्के एवढे झाले आहे.

मंगळवारी ३४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा १,४०,६३६ इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन ११,८४७ इतकी आहे. मंगळवारी ८८६ रुग्णांसह करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२५,८७२ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here