@maharashtracity
मुंबईतील कोरोना स्थितीत सण-उत्सवांमुळे
मुंबई: मुंबईतील (Mumbai) रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून मुंबईकरांसाठी ही दिलासादायी बाब आहे. तरीही गेल्या तीन महिन्यापासून या कालावधीत प्रचंड चढउतर असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी अधिक होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी कमी दिवसांवर आला होता. ऑक्टोबर महिन्यात साजरे करण्यात आलेले सण- उत्सव (festive season) यामागील कारण आहे का याची शक्यता तपासली जात आहे.
दरम्यान, मुंबईत ५ सप्टेंबर रोजी रुग्ण दुपटीचा कालवधी १३६३ दिवसांवर होता. तर महिनाभराच्या कालावधीनंतर म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ११५४ दिवसांवर नोंदविण्यात आला. म्हणजेच दोनशे दिवसांनी रुग्ण दुपटीचा कालावधी मागे आला.
यामागे ऑक्टोबर महिन्यात साजरा करण्यात आलेला नवरात्रौत्सव (Navratri Festival) कारणीभूत आहे का याची शक्यता पडताळली जात आहे. कोरोनाचे प्रोटोकॉल (corona protocol) पाळूनच सण उत्सव साजरे करण्याचे आदेश असले तरी देखील गणेशोत्सवापासूनच बाहेर फिरणारऱ्यांची गर्दी सुरु झाली आहे.
यात लसीकरण (vaccination) केलेल्यांची संख्या मुंबईत बऱ्यापैकी असली तरी देखील अद्याप दुसऱ्या लसीची मात्रा घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे महिनाभरात कमी झालेल्या रुग्ण दुपटीच्या कालवधीचे कारण तपासले जात आहे.
तर दुसऱ्या बाजूला लगेच महिनाभराच्या कालवधीनंतर म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी १८३२ दिवसांवर आल्याने त्या दोन महिन्याची कसर भरुन काढल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ११५४ एवढा नोंदविण्यात आला होता. त्यामुळे महिनाभरात सुमारे ६७८ दिवस वाढल्याचे ध्यानात येत आहे.
दरम्यान, रुग्ण दुपटीचा कालावधी रुग्णाची स्थिती आणि दररोजची नोंद यावर अवलंबून असून महिनाभराचा कालावधी ग्राह्य धरल्यास तफावत नक्की दिसून येणार, असे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. मात्र रुग्ण दुपटीचा कालावधी सतत वाढत असून मुंबईकरांसाठी (Mumbaikar) तो चांगला संकेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले