@maharashtracity

धुळे: धुळे शहराजवळील फागणे बाळापूर गावातील विद्युत महावितरणामार्फत सक्तीने व जबरदस्तीने इलेक्ट्रिक बिल वसुली होत असून विज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

या मनमानी कारभाराविरुध्द बाळापुरचे भाजपा नगरसेवक संजय बापु पाटील यांनी ग्रामस्थांच्या सोबत आंदोलन करीत कारवाईची मागणी केली. (BJP protest against electricity bill)

वीज ग्राहकांना कुठलीही नोटीस न बजावता सहाय्यक अभियंता आशिष कासार हे विज ग्राहकांना अर्वाच्च भाषेत बोलून मानसिक त्रास देवून संबंधित ग्राहकांच वीज कनेक्शन देखील कट करत आहे. घरात कर्ता पुरुष नसताना अर्वाच्च भाषेत बोलून सहाय्यक अभियंता कासार पठाणी वसुली करत आहे.

त्यामुळे सहायक अभियंता कासार यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक संजय पाटीलसह केंद्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व बाळापुर व फागणे ग्रामस्थांच्या वतीने वीज महावितरण विभागाला करण्यात आली आहे.

कोरोनाच्या गंभीर अशा परिस्थीतीत सर्वत्र आर्थिक चक्र थांबले असताना फागणे येथील विद्युत महावितरण विभागाकडून वीज देयक भरण्यासाठी सहाय्यक अभियंता आशिष कासार यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास दिला जात आहे.

तसेच वीज ग्राहकांना कुठलीही नोटीस न बजावता कर्त्या पुरुषाला माहिती न देता घरात महिला असताना त्यांनाच अर्वाच्च भाषेत बोलत वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. तसेच बाळापूर गावात डीपी जळत असल्याने शाळेकरी मुलासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेक वेळा समस्या सांगायला गेल्यावर सा.अभियंता कासार गावातील गुंड लोकांची धमकी देऊन दादागिरी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी समस्या कोणाकडे मांडावी असा प्रश्न नगरसेवक संजय पाटील यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here