@maharashtracity

महापौर, पालिकेकडून श्रद्धांजली

मुंबई: मुंबईचे माजी महापौर व राज्याचे माजी शिक्षण मंत्री सुधीर जोशी (८१) यांचे गुरुवारी दुःखद निधन झाले.

याबाबतचे वृत्त ऐनवेळी समजताच मुंबई महापालिकेची (BMC) सभा कोणतेही कामकाज न करता महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यासह सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी श्रद्धांजली वाहून तहकूब केली.

सुधीर जोशी (Shiv Sena leader Sudhir Joshi) यांच्या निधनामुळे शिवसेनेचा सुसंस्कृत आक्रमक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे, या शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.

सुधीर जोशी हे मुंबई महापालिकेत १९६८ ते १९७७ या कालावधीत शिवसेना नगरसेवक होते. पालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ८२ मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी पालिकेत गटनेतेपदी व पालिका विरोधी पक्षनेते पदी काम केले होते. त्यानंतर ते १९७३ -७४ मध्ये शिवसेनेचे दुसरे महापौर म्हणून निवडून आले. त्यांनी चांगल्या पद्धतीने महापौर पदावर काम केले.

तसेच त्यांनी, १९६८ ते १९७१ या कालावधीत स्थायी समितीवर सदस्य, १९६८ -६९ मध्ये बाजार व उद्यान समितीवर सदस्य, १९७२ – ७३ मुंबई महापालिका अधिनियम समितीवर सदस्य, १९७० – ७२ या कालावधीत मुंबई विकास योजना अंमलबजावणी समितीवर सदस्य, १९७२ – ७३ मध्ये शहर नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच, दादर माटुंगा सामाजिक संस्थेवरही त्यांनी काम पाहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here