कल्याणमध्ये नरेंद्र पवार यांच्या हस्ते अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन

Twitter: @maharashtracity

कल्याण: अहिराणी भाषा हा मराठी भाषेचा साज आहे, अहिराणी भाषेने मराठीतला गोडवा जपला, अहिराणी खाद्य संस्कृती आणि भाषा यामुळे समाजात ती वैभवशाली परंपरा तेवत आहे, अहिराणी दिनदर्शिकेच्या माध्यमातून अहिराणी भाषा आणि त्या परंपरा तेवत ठेवण्याचे महत्वाचे काम होईल यात शंका नाही, असा विश्वास भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.

कल्याण (प.) येथे “उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ” संचलित “जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेच्या वतीने “अहिराणी दिनदर्शिका” चे प्रकाशन नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

समाजात परिवर्तन होत असताना, दोन पिढ्यांचे संक्रमक होत असताना, तो वारसा एकाकडून दुसरीकडून जात असताना अशा दिनदर्शिका महत्वाच्या ठरत असल्याचे मतही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष एन.एम.भामरे, संपर्क प्रमुख प्रकाश पाटील, ज्ञानदेव शामराव भोई (अध्यक्ष कल्याण भोई समाज सेवा संस्था), सुहास खैरनार, एन बी पाटील, अनिल सुर्यवंशी, महेंद्र राजपूत, सुजित मोरे, रमेश नवले, प्रल्हाद बिरारी, रहिवासी पवनधाम कल्याण प. तसेच भोई समाज सेवा संस्था महिला मंडळ आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here