@maharashtracity

धुळे: जिल्ह्यातील श्री.भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण, जलकुंभ, पोच मार्ग, संरक्षण भिंत, खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण, या विविध कामांसाठी एकूण 20 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती शहराचे आमदार फारुक शाह (MIM MLA Faruk Shah) यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (government medical college) येथील रस्ते पूर्णपणे खराब झाले होते. हे रुग्णालय राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असल्याने पोचमार्ग बनविणे आवश्यक होते. महाविद्यालयाच्या सुरक्षतेसाठी संरक्षण भिंत बनविण्यासाठी व या परिसरातील खेळाच्या मैदानाच्या जमीन सपाटी करण्यासाठी तसेच रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी व रुग्णालयाच्या पाण्याची टंचाई दुर करण्यासाठी पाण्याची टाकी बांधणे आवश्यक आहे.

या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता होती. त्यामुळे आमदार फारूक शाह यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळोवेळी प्रत्यक्ष भेट घेतली.

त्या अंनुषगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरणासाठी 10 कोटी, पाण्याच्या टाकीसाठी 1 कोटी 70 लक्ष आणि पोच मार्ग, संरक्षण भिंत, खेळाचे मैदान तयार करणेसाठी 8 कोटी 74 लक्ष असा एकूण 20 कोटी 44 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here