@maharashtracity

मुंबईच्या जुहू चौपाटीवर टार बॉल्स आढळून आल्याने त्यावर गोंधळ उडाला. दरम्यान हे टार बॉल्स काढून टाकण्यात आले असले तरी रविवार असून मुंबईकरांना चौपाटीवर जाता आले नसल्याने ते निराश झाले. मात्र प्रचंड संख्येने टार बॉल्स पाहून हे बॉल्स कोणी मुद्दाम मुंबईच्या समुद्रात टाकत असणार अशी चर्चा रंगली.

दरम्यान समुद्राच्या पोटात असलेल्या तेलाचे गोळे किंवा समुद्रात फिरणारी मोठी जहाजे कंटेनर यांनी सोडलेल्या सांड तेलाचे गोळ्यात रुपांतर होत असल्याचे समुद्र जीव अभ्यासकांनी सांगितले. हे गोळे वाऱ्याच्या वेगासोबत तसेच लाटांवर चौपाट्यांवर धडकत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले. मात्र याचा परिणाम समुद्र जीव साखळी वर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

समुद्र जीव रक्षक अभ्यासक सुनिल कनोजिया यांच्या म्हणण्यानुसार संशोधकांच्या अभ्यासानुसार समुद्राच्या पोटात विपूल प्रमाणात तेल आहे. पावसाळ्यात समुद्राच्या तळाशी असलेला हा तेलमिश्रित गाळ हळू हळू खुला होऊन त्यातून तेल बाहेर येते. हे तेल एकत्र येऊन याचे गोळे तयार होतात.

हे गोळे वाऱ्या सोबत लाटांवरुन वाहत येतात. आता मुंबईच्या दिशेने वारे असल्याने टार बॉल्स मुंबईत आले असल्याचे कनोजिया म्हणाले. टार बॉल्स पावसाळ्यात समुद्रात येतात. मात्र पावसाळ्यात समुद्रावर कोणी जात नसल्याने मानवी जीवनावर थेट परिणाम होताना दिसून येत नाही.

मात्र मासे या टार गोळ्यांना खातात. त्यामुळे समुद्र जीव सृष्टीवर या टार बॉल्सचा परिणाम होतो. यातून मासे काठावर येऊन मरणे, जाळ्यात देखील मेलेले मासे आढळून येणे असे पकार अलिकडे पावसाळ्यात वाढले आहेत. शिवाय टार बॉल्स खाल्लेले मासे आपण खातो. त्यामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामावर अद्याप अभ्यास होणे बाकी आहे.

तसेच मोठे मोठे कंटेनर तसेच शिप मधून सोडलेले वेस्ट वॉईलमुळे देखील टार बॉल्स निर्माण होत असल्याचा अंदाज करण्यात आला. सध्या भरतीची वेळ असल्याने पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.

तसेच कोणाला आत जाऊ देत नाहीत. मात्र टार बॉल्स आता काढून टाकण्यात आले असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र हे टार बॉल्स हजार किलोहून अधिक असून पाच ते चार इंचाहून अधिक असल्याचा अंदाज समुद्र जीव रक्षक आणि पर्यावरण तज्ज्ञ सुनिल कनोजिया यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here