१२ जण जखमी ; त्यापैकी एकजण गंभीर

१२ जखमींपैकी ७ जण रुग्णालयात दाखल

@maharashtracity

मुंबई: चेंबूर, गणेश नगर झोपडपट्टीतील इंडस्ट्रीयल भागात असलेल्या तळमजला अधिक एक मजली गारमेंटमधील पोटमाळ्याचा भाग गुरूवारी दुपारी कोसळला. या घटनेत १२ जण जखमी झाले. त्यापैकी ७ जणांना नजीकच्या इनलॅक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

चेंबूर, मोनो रेल्वेजवळील पोल नंबर १०, नवजीवन सोसायटी, सनसिटी हॉटेलजवळ, पुष्पक कंपाउंड, गणेशनगर या ठिकाणी झोपडपट्टीतील इंडस्ट्रीयल भागात काही छोटे छोटे कारखाने, गारमेंट, लघुउद्योग वगैरे आहेत. या ठिकाणी एक मजली गारमेंटमध्ये काही कामगार पोटमाळ्याच्या ठिकाणी तर काहीजण खालील भागात काम करीत असत. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक मजली गारमेंटमध्ये पोटमाळ्याचा भाग अचानकपणे कोसळला.

ही घटना घडली त्यावेळी मोठा आवाज झाला. आजूबाजूचे लोक तातडीने घटनास्थळी धावून आले व बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांना किरकोळ मार लागला व ते थोडक्यात बचावले. तर ७ जण जखमी झाल्याने नजीकच्या इनलॅक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकजण गंभीर जखमी आहे.

या घटनेची माहिती मिळताच भाजपचे माजी नगरसेवक महादेव शिवगण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेतील जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित जखमींना बरे वाटल्यावर त्यांना रुग्णालयामधून घरी पाठविण्यात येईल. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे, अशी माहिती माजी नगरसेवक महादेव शिवगण यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

रूग्णालयात दाखल जखमींची नावे

(१) मुराद अली (२२)
(२) धीरज कुमार (१९)
(३) रेहान खान (१९)
(४) विलास कुलकर्णी (५८)
(५) मोहन पाठक (५५)
(६) प्रेमनाथ धनावडे (५३)
(७) मुरारी झा (२२)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here