@maharashtracity

परदेशातून आलेले प्रवासी पालिकेच्या रडारवर

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून ( BMC) कोविड ३७० नमुन्यांची जिनोम तपासणी ( Genomic Test) सुरु केली आहे. जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या एवाय.४.२ या वेरियंटच्या ( AY varient) वर्गीकरणांसाठी ही तपासणी सुरु केली असून या तपासणीत प्रामुख्याने परदेशातून आलेले प्रवासी रडारवर आहेत.

ज्या देशात एवाय.४.२ वेरियंटचे रुग्ण आढळून आले अशा देशातून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात आला आहे.

दरम्यान एवाय.४.२ वेरियंटमुळे युरोपात ( Europe) अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले. हा वेरियंट घातकी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोलताना मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Mumbai Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी सांगितले की, मुंबईत जलद संसर्ग करणारा वेरियंट आहे का हे तपासण्यासाठी आताच्या जिनोम सिक्वेसिंग (Genom Sequecing) सुरु करण्यात आली आहे.

Also Read: लसीकरणाच्या ट्रायलसाठी १७ मुलांची नोंद

मात्र तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेने परदेशातून मुंबईत आलेल्या प्रवाशांची यादी मागविली असल्याचे वृत्त आहे. ज्या देशांमध्ये एवाय.४.२ वेरियंट धुमाकुळ घालत आहे अशा देशांतून आलेल्या प्रवाशांची यादी मागविण्यात आली.

दिवाळी पूर्वी डेल्टा ( Delta) उपपकाराच्या संसर्गाबाबत ही माहिती घेण्यात येणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेल्या तीन जिनोम सिक्वेसिंग तपासणीत कोणताही नवा म्युटंट आढळला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मात्र राज्य कोरोना कृती समितीतील एका तज्ज्ञाच्या मते गेल्या कित्येक महिन्यांपासून डेल्टा वेरियंटने वैद्यकीय क्षेत्रासमोर आव्हान उभे केले आहे.

भारत अद्यापही डेल्टा प्रभावाखाली असून डेल्टा उग्र होण्यास वेळ लागणार नाही. शिवाय एवाय.४.२ सारखे उपपकार भारताला घातकी ठरु शकतात.

मात्र कोव्हिशिल्ड ही लस डेल्टावर प्रभावी असून मुंबईतील जिनोम सिक्वेसिंगच्या यापूर्वीच्या अहवालातून रुग्ण, गंभीर रुग्ण आणि मृत्यू कोविशिल्डमुळेच ( Covieshield) कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बदलता म्युटेशिन हा मूळ विषाणूच्या तुलनेत गंभीर रुग्ण आणि मृत्यू वाढविण्यास कारणीभूत ठरु शकतो. दरम्यान ज्यांचे लसीकरण ( Vaccination) पूर्ण झाले आहे अशांना एवाय.४.२ पासून कमी त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र हा वेरियंट लस न घेतलेल्या व्यक्तिसाठी जीवघेणा ठरु शकतो असे ही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here