@maharashtracity

मुंबई: घाटकोपर ( प.), असल्फा व्हिलेज (Ghatkopar) या ठिकाणी सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत काही गोदामे, झोपड्या (godown, shanties gutted in fire) जळून खाक झाल्या. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मनीषा चौरसिया (१४) आणि अनैया चौरसिया (३) या दोघी बहिणी किरकोळ जखमी झाल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, घाटकोपर (प.), असल्फा व्हिलेज, डिसिल्वा कंपाऊंड, नारी सेवा सदन रोड, सुंदर बाग येथील औषधी बाटल्यांच्या गोदामाला मंगळवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग काही अवधीतच वाढत जाऊन लेवल -२ ची झाली. या आगीत सोफा, मिक्सर बनविण्याचे गोदामे व काही झोपड्या यांना वेढले होते.

या आगीची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. कोणीतरी अग्निशमन दलाला फोन करून आगीबाबत कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

या आगीमुळे मनीषा चौरसिया (१४) आणि अनैया चौरसिया (३) या दोन्ही बहिणी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी या भीषण आगीवर तब्बल चार तासांनी नियंत्रण मिळवले. ७ फायर इंजिन व ७ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझविली.

ही आग का व कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here