@maharashtracity

राज्यात १,७१५ नवीन रुग्ण

मुंबई: मुंबईत रविवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली. यापूर्वी २६ मार्च २०२० रोजी मुंबईत शून्य कोरोना मृत्यू नोंदविण्यात आले होते. (No death due to corona)

कोरोना मृत्यू शून्य नोंदीची हे दुसरी वेळ असल्याचे मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबई महानगर पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी केल्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. रविवारी मुंबईत ० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आता पर्यंत मुंबईत १६१८० मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, मुंबईत दिवसभरात ३६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५१६५९ एवढी झाली आहे. तर राज्यात रविवारी १,७१५ नवीन रुग्णांची नोंद झाली.

Also Read: कोविड मृतांच्या वारसांना ५० हजाराची मदत

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,९१,६९७ झाली आहे. काल २,६८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१९,६७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २८,६३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच रविवारी राज्यात २९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७(१०.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here