@maharashtracity

वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन चिघळले

मुंबई: अस्थायी प्राध्यापकांच्या आंदोलनाला २४ दिवस उलटूनही वैद्यकीय शिक्षकांच्या (medical teachers) प्रश्न सुटताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आंदोलनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (government medical colleges) बंद पडण्याच्या मार्गावर आहेत की काय अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.

सरकार दरबारी वैद्यकीय शिक्षण विभागास कोणी वाली आहे का? आरोग्य विभागातील प्रश्न तातडीने सोडविले जातात. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सापत्न वागणुक मिळत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना काळात (corona pandemic) मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सेवा नियमित करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, कोरोना संपला की आश्वासनाचा विसर पडतो. वैद्यकीय शिक्षकांना फसवल्याची भावना दृढ होत जात आहे.

कोरोना काळात व्हेंटिलेटरवर (ventilator) असणाऱ्या रूग्णांचे जीव वाचवण्याचे काम तसेच आरटिपीसीआर (RTPCR) तपासण्यासाठी व्हिआरडीएल प्रयोगशाळा उभारण्याचे महत्वाचे व जोखमीचे काम वैद्यकीय शिक्षकांनी कोविड काळात केले. कोविड काळात केलेल्या या कामाचे कौतुक न करता सचिवांनी अपमानित केले असल्याचे हे प्राध्यापक सांगतात.

याउलट आरोग्य विभागात डॉक्टरांचे मनोबल वाढवण्याचे काम आरोग्यमंत्री यांनी केले. २००० डॉक्टरांची पदे तात्काळ भरली. विशेष कोविड भत्ते देण्यात आले. मात्र, प्राध्यापकांवर अन्याय होत आहे. वैद्यकीय शिक्षकांनी सर्वानुमते असहकार पुकारला असून पदवी पूर्व व पदव्युत्तर विद्यार्थीं प्रवेश प्रक्रिया हे न करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षक संघटनेने घेतला आहे.

अध्यापन न करणे, प्रशासकीय कामे न करणे या सारखे असहकार (non-cooperation) पुकारण्याचा ठराव संमत करण्यात आला, असे संघटनेचे सचिव डॉ समीर गोलावार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here