@maharashtracity

राज्य आरोग्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

मुंबई: कोरोना संसर्ग शहराकडून ग्रामीण भागात पसरत असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. यात ओमिक्रॉन (omicron) आणि डेल्टाचा (Delta Variant) संसर्गाचा प्रभाव दिसून येत असून राज्यातील शहरांसह ग्रामीण भागातील रुग्णांचा ४२०० हून अधिक जीनॉम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) नमुन्यात ६८ टक्के डेल्टा व्हॅरियंत तर ३२ टक्के ओमिक्रॉन आढळून आले आहे.

डेल्टा आणि ओमिक्रोनचा हा अहवाल आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (Dr Pradeep Vyas) यांनी नमूद करून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इशाऱ्याचे पत्र पाठवले आहे.

दरम्यान ४२०० नमुन्यात १३६७ नमुने ओमिक्रॉन व्हेरियंट तर २८५६ नमुन्यात डेल्टा व्हेरियंट आढळला आहे. सध्या मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune), नाशिकसारख्या (Nashik) शहरांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी यााठिकाणी लसीकरणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लसीकरणावर (vaccination) भर देवून आणि कोविड नियमांच्या पालनावर भर देण्यास सुचविण्यात आले आहे.

तर सौम्य लक्षणांचा ओमिक्रॉन देखील जोखमीच्या सहव्याधी रुग्णांना घातक असून उपचारावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेला ओमिक्रॉन वेरियंट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात आला. तर महाराष्ट्रात मंगळवारपर्यंत १८६० ओमिक्रॉन बाधित रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here