जिल्हा तिळवण तेली समाजाची मागणी
@maharashtracity
धुळे
धुळे शहरातील देवपूर आणि जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील वेगवेगळ्या घटनेत सहा वर्षांच्या बालिकांवर अत्याचार करणार्या नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी धुळे जिल्हा तिळवण तेली समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात मंगळवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष भगवान करनकाळ, सतीष महाले, युवराज चौधरी, भाऊसाहेब चौधरी, उमेश चौधरी, कमलाकर अहिरराव, प्रमोद चौधरी, अॅड.चंद्रकात चौधरी, जयश्री अहिरराव, सागर चौधरी आदी समाजबांधव उपस्थित होते.
निवेदनात म्हटल्यानुसार, देवपूरातील कृषी नगरातील एका सहा वर्षीय बालिकेवर 56 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक झाली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथेही एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला आहे. महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे की अशा घटना आजही घडत आहेत. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. यामुळे या दोन्ही घटनेतील बालिकांवर अत्याचार करणार्या दोन्ही नराधमांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा तिळवण तेली समाजाने केली आहे.