@maharashtracity

धुळे: कोरोनाशी (corona) मुकाबला करण्यासह खान्देशातील (Khandesh) आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Health MoS Dr Bharati Pawar) यांनी येथे दिली. भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रेचा धुळे (Dhule) शहरात शुक्रवारी रात्री समारोप झाला.

जनआशिर्वाद यात्रेच्या (Jan Aashirwad rally of BJP) समारोपानिमित्त शहरात आग्रारोडवरुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर अग्रवाल भवनात मेळावा झाला. या वेळी माजी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), जयकुमार रावल (Jaykumar Rawal), आमदार अमरिश पटेल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.

डॉ भारती पवार म्हणाल्या, तळागळातील प्रत्येक व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार कार्यरत आहे. देशात कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम करण्यात आल्याने फार नुकसान झाले नाही. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नुकतेच २३ हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर त्यांनी सांगितले.

त्याआधी शुक्रवारी दुपारी नंदुरबार (Nandurbar) येथून दोंडाईचा (Dondaicha) शहरात डॉ.भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आगमन झाले. दोंडाईचा शहरात देखील रॅली काढण्यात आली. दोंडाईचा नगरपालिका आवारात झालेल्या मेळाव्याप्रसंगी आमदार जयकुमार रावल यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून दिलेल्या कार्डियाक ऍम्ब्युलन्सचे लोकार्पण मंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here