@maharashtracity

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) ओसरत असली तरी पूर्ण गेली नाही. मात्र या तिसऱ्या लाटेत मंगळवारी सर्वाधिक ओमिक्रोन रुग्ण (Omicron patients) नोंद करण्यात आली.

राज्यात मंगळवारी ३५१ ओमीक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून औरंगाबादमध्ये १४८ एवढी सर्वाधिक नोंद होती. तर नाशकात १११, पुणे शहरात ७२, पुणे ग्रामीणमध्ये १२, यवतमाळमध्ये २ तर साताऱ्यात एक ओमिक्रोन रुग्ण आढळला असल्याचे राज्य आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात मंगळवारी २ हजार ८३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ८ हजार ६९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के एवढे असून दिवसभरात ३५ कोरोना मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. तर राज्यात ३० हजार ५४७ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here