@maharashtracity

६ हजार ५३२ गौरी, हरतालिकांचे विसर्जन

गणेशोत्सवात २,६५,९८९ किलो निर्माल्य जमा

निर्माल्याचे खत बनवून उद्यानात वापरणार

मुंबई: यंदा कोरोनामय वातावरणात नियमांचे पालन करून लाखो मुंबईकरांनी श्रीगणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा केला. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात गणेशभक्तांनी स्वतःवर काही प्रमाणात मर्यादा घालून गणेशाची विधिवत पूजाअर्चा करून समुद्र, तलाव, खाडी अशा ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि १७३ कृत्रिम तलाव अशा २४६ विसर्जन स्थळी श्रीगणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांच्या कालावधीत
१ लाख ५७ हजार २२९ गणेशमूर्तींचे आणि ६ हजार ५३२ गौरी, हरतालिकांचे असे एकूण १ लाख ६४ हजार ७६१ गणेशमुर्तीं, गौरी, हरतालिका यांचे निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले.

कृत्रिम तलावातील विसर्जन

यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जित करण्यात आलेल्या १ लाख ६४ हजार ७६१ पैकी ७९ हजार १२९ गौरी, गणपती मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्‍ये उर्वरित ८५ हजार ६३२ गौरी, गणपती मूर्तींचे नैसर्गिक स्थळी विसर्जन करण्यात आले.

१७३ कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित ७९ हजार १२९ गौरी, गणपतीमूर्तींपैकी ७५ हजार ६८७ घरगुती तर उर्वरित ३ हजार ४४२ मूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या.

नैसर्गिक विसर्जन स्थळी विसर्जन

मुंबईतील समुद्र चौपट्या, खाडी, तलाव आदी ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी ८५ हजार ६३२ गौरी, गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये, ८२ हजार ३३९ एवढ्या गणेशमूर्ती होत्या.

तर ३ हजार २९३ एवढ्या हरतालिका / गौरी मूर्ती होत्या. नैसर्गिक स्थळी विसर्जित करण्यात आलेल्या ८२ हजार ३३९ गणेशमूर्तीपैकी ७७ हजार ८१४ या घरगुती गणेशमूर्ती होत्या, तर ४ हजार ५२५ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती होत्या.

पाचव्या दिवशी सर्वाधिक ६६ हजार २९९ गौरी, मूर्तींचे विसर्जन

२४६ विसर्जन स्थळी विसर्जित केलेल्या १ लाख ६४ हजार ७६१ गौरी, गणपतीमूर्तींपैकी सर्वाधिक ६६ हजार २९९ गौरी, गणपतींमूर्तींचे विसर्जन हे ५ व्या दिवशी म्हणजे १४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

त्यापाठोपाठ, ४८ हजार ७१६ गौरी, गणपतीमूर्तींचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दीड दिवस) म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. त्यानंतर ३४ हजार ४५२ गौरी, गणपतीमूर्तींचे विसर्जन हे गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर अनंतचतुर्दशी दिनी करण्यात आले.

तर सर्वांत कमी म्हणजेच १५ हजार २९४ गौरी, गणपतीमूर्तींचे विसर्जन १६ सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी करण्यात आले.

निर्माल्य संकलन व खतनिर्मिती

गणेशोत्सवात गणेशमूर्तींसह गौरी, हरतालिका यांचे विसर्जन झाल्यावर २४६ विसर्जन स्थळी निर्माल्य कलशाच्या माध्यमातून १० ते १९ सप्टेंबर या कालावधी एकूण २ लाख ६५ हजार २७९ किलोग्रॅम इतके हार, फुले, दुर्वा रूपाने निर्माल्‍य जमा करण्‍यात आले आहे.

यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६० हजार ९०० किलो इतके निर्माल्य हे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी जमा करण्यात आले. सदर जमा निर्माल्‍यावर विविध ३८ ठिकाणी शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्‍यात येत असून त्यापासून खत तयार करून त्या खताचा महापालिकेच्या उद्यानांमध्ये उपयोग करण्यात येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here