@mahatshtracity

मुंबई: साथरोगाच्या आकडेवारीनुसार २०२० वर्षात एच१एन१ चे ४४ रुग्ण नोंदविण्यात आले होते. मात्र यावर्षी ऑक्टोबरपर्यंत ६१ रुग्ण झाले आहेत. ही वाढती संख्या आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यापर्यंत स्वाईन फ्लूच्या ( Swine flu) रुग्णांमध्ये ३८.६३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यात सात ते आठ रुग्णांची कोविडप्रमाणे ताप, खोकला आणि घसादुखीची लक्षणे दिसून आल्याने यातील १० रुग्णांची चाचणी केली असता यात बहुतांश रुग्ण इन्फ्लूएंझा ( Influenza) आणि स्वाइन फ्लूचे बाधित असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान आरोग्य विभागाच्या ( Department of Health ) माहिती नुसार एच१एन१ ( H1N1) सोबत एच३एन२ ( H3N2) चे रुग्ण देखील नोंद होत आहेत. संशयित रुग्ण कोविड उपचारांना प्रतिसाद देत नसल्यास स्वाईन फ्लूची तपासणी करुन उपचार घेण्याबाबत सुचविण्यात येत आहेत.

आढळलेल्या रुग्णांमध्ये इन्फ्लूएंझा एची चाचणी पॉझिटिव्ह येत असून गेल्या वर्षी स्वाइन फ्लू इन्फ्लूएंझाचे रुग्ण कमी आढळून येत होत असल्याचे पालिका आरोग्य विभागातील अधिकारी सांगतात.

शिवाय इतर विषाणूजन्य संसर्गात रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस ( Respiratory syncytial virus) सारखे संसर्गजन्य आजार देखील पसरत आहेत. त्यामुळे एखा रुग्ण कोविड उपचारांना प्रतिसाद देणारा नसल्यास त्वरीत स्वाईन फ्लूच्या उपचार करण्यास सुचविण्यात आले आहे.

एच१एन१ आणि कोविड१९ ( Covid19) हे दोन्ही विषाणू एकाच प्रकारातील असून कोणतेही निदान हे क्लिनिकल पॅरामीटर्सवर ( Clinical parameters ) आधारित असते आणि प्रयोगशाळेच्या चाचणीवर होत नसल्याचे संसर्गजन्य विशेषज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव (Infectious specialist Dr. Om Srivastava) म्हणाले.

तर डॉ. पिनाक पंड्या ( Dr Pinak pandy) नवीन प्रकार वेगळा सुरुवातीला तो सौम्य असतो. यात अनेक लक्षणे नसतात. मात्र असा प्रकार मुंबईत आढळलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुंबईतील स्वाईन फ्लूचे रुग्ण गेल्या एक ते दीड वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये जरी कोविड १९ ची चाचणी निगेटिव्ह ( Corona test) आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here