@maharashtracity
राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच उपकम
मुंबई: इंडियन सायकेट्रिक सोसायटी (Indian Psychiatric Society) कडून आत्महत्येपासून परावृत्त करण्यास मदतनीस ठरेल अशी हेल्प लाईन ( Helpline) दिवाळीच्या मुहुर्तावर सुरु करण्यात अली. सोसायटीचा हा पहिलाच प्रयत्न असून सुरु केल्या पासून सहा तासात या हेल्पलाईनवर १७ कॉल्स आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान प्रत्येक सेकंदाला दोन ते तीन जणांच्या मनात आत्महत्येचा विचार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निराश मनाला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याची तसेच जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.
आत्महत्येचा विचार करण्याचा टोकाचा निर्णय एखादी व्यक्ती का घेते यावर विचार केला पाहिजे असल्याचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा (Senior Psychiatrist Dr. Sagar Mundada) यांनी सांगितले. तर इंडियन सायकेट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गौतम सहा ( Dr. President of the Indian Psychiatric Society Gautam Saha) यांच्या म्हणण्यानुसार मनातील भिती बद्दल किंवा गंडा बद्दल कोणतीही व्यक्ती दुसऱ्याकडे व्यक्त होत नाही. भिती, गंड आणि लाजरा स्वभावामुळे अनेक जण मनातच कुढत असतात.
मात्र अशा व्यक्ती फोनवरुन बोलण्यास तयार होतात. म्हणून हेल्पलाईन सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. १८००-५३-०८०७ ही हेल्पलाईन सध्या मर्यादित वेळेसाठी असली तरी देखील २४ तास तसेच वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेतून खुली करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान कोणाला ही आत्महत्येपासून परावृत्त करण्याकडे हे महत्वाचे पाऊल असून अद्याप अशी राष्ट्रीय पातळीवर हेल्पलाईन नव्हती. याचा फायदा नक्की होईल असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.