धुळे, नंदुरबार जिल्ह्याला प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

धुळे: गुजरात (Gujarat) राज्यातले उद्योग महाराष्ट्रात (Maharashtra) यायला तयार झाले आहेत. गुजरातच्या वस्त्रोद्यागाशी संबंधीत व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ अलिकडेच आम्हाला भेटले. त्यावेळी सुरतपासुन धुळे-नंदुरबार (Dhule – Nandurbar) जवळ असल्याने येथेच उद्योग उभारावे असा आग्रह आम्ही धरला आहे. यामुळे प्राधान्याने ते उद्योग धुळे, नंदुरबार जिल्ह्यात येण्याची दाट शक्यता आहे, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. (Industries in Gujarat interested to set up in Maharashtra)

धुळे शहराला लागून असलेल्या अवधान एमआयडीत 100 गोदामांचा प्रकल्प उभारला जाणार असून सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industries minister Subhash Desai) यांच्या हस्ते त्या प्रकल्पाचे भुमिपूजन झाले. यावेळी आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil), आ. फारुक शाह (MLA Faruk Shah), आ. मंजुळा गावीत (MLA Manjula Gavit), महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe), अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, नाशिकचे सुभाष घिया, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग (Nitin Bang), राजेश गिंदोडिया, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता मिलिंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित आदी उपस्थित होते.

यावेळी ना.देसाई म्हणाले की, शासनाने प्रशासन गतीमान करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच करोना काळात देखील 60 कंपन्यांचे सांमजस्य करार झाले. नवे वस्त्रोद्योग धोरण (New Textile policy) आखल्याने गुजरातच्या सुरतमधील व्यापारी आता आपल्या राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहे.

Also Read: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड…

“अलीकडेच गुजरातच्या व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ मला भेटले. राज्यात उद्योग उभारणीसंदर्भात त्यांनी चर्चा केली. त्यावेळी सुरतमध्ये उद्योग का नाही उभारत अशी विचारणा केली असता त्यांनी जागा कुठे शिल्लक आहे, असे सांगितले. त्यावर आम्ही सुरतपासुन धुळे-नंदुरबार जवळ असल्याने तेथे वस्त्रोद्योग उभारा असे सुचविले,” असे देसाई यांनी सांगितले.

येथे पायाभुत सुविधा (infrastructure) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जमिनही कमी किंमतीत मिळेल त्यावर गुजरातच्या व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी पुस्ती सुभाष देसाई यांनी जोडली.

ते पुढे म्हणाले, काहींनी एमआयडीसींमध्ये जमिनी घेतल्या आहेत. मात्र ते उद्योग करतच नाहीत. त्यामुळे जे उद्योग उभारत नाही अशांचे प्लॉट एक इशारा देेवून शासन ताब्यात घेईल.

आतापर्यंत राज्यातील एमआयडींमधील बिनउद्योगी 1 हजार 800 भुखंड शासनाने ताब्यात घेतले आहेत. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक संकटे आली. या संकटांना शासनाने तोंड दिले आहे. या काळातही उद्योगांच्या वाढीसाठी शासन काम करीत आहेत, असे देसाई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here