११ अपघातग्रस्त उपचाराधीन

मुंबई: महाड-पोलादपूर (Mahad – Poladpur) दुर्घटनेतील जखमी अपघातग्रस्त राज्य सरकारच्या मुंबईतील जे जे रुग्णालयात (JJ Hospital) उपचारार्थ दाखल झाले असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. शनिवारी सकाळपर्यंत ८ व्यक्ती दाखल होत्या. मात्र सायंकाळी आणखी ३ जण दाखल झाल्याने आता एकूण संख्या ११ झाली आहे. सर्व रूग्ण स्थिर असल्याचे डॉ. सुरासे यांनी सांगितले.

हे सर्व महाड, तलया आणि पोलादपूर रायगड येथील हे सर्व जण आहेत. यात ४ वर्षाचे बालक ही आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वाती कोंडाळकर (२१) रा. महाड तलया, रेश्मा कोंडाळकर (३८) रा.महाड तलया,  स्वप्नील शिरवळे(२६) रा.महाड तलया,संगीता कोंडाळकर (४१) रा.महाड तलया, नीलिमा सुतार (२८) रा. पोलादपूर रायगड, सार्थक सुतार (४) रा. पोलादपूर रायगड, भारत सुतार (५०) रा. पोलादपूर रायगड, निलेश सुतार (३२) रा. पोलादपूर रायगड अशा आठ जणांची नावे असून सायंकाळी उशिरा आणखी 3 जण दाखल झाले. असे आता पर्यंत ११ जण जेजे रुग्णालयात दाखल झाले असल्याचे जे जे रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. ११ ही जण किरकोळ जखमी असून उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येईल असे ही डॉ. सुरासे म्हणाले.

पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल

मदत व पुनर्वसन विभागाने आज रात्री ९.३० वाजता दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ मृत्यू झाले असून ३२२१ जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर ५३ लोक जखमी असून ९९ लोक बेपत्ता आहेत १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here