@maharashtracity

महाड: चवदारतळे सत्याग्रह दिनाच्या (Chavdar Tale Satyagrah) निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद, महाड आणि चवदारतळे साहित्य मंच, महाड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदारतळे समोरील प्रांगण या ठिकाणी कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलनाचे (Kavi Sammelan) आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर शेठ यांच्यासह जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम, कोमसाप महाड अध्यक्ष गंगाधर साळवी, चवदारतळे साहित्य मंचाचे मार्गदर्शक मारुती सकपाळ, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र महाडिक, बौध्दजन पंचायत समिती महाडचे अध्यक्ष अशोक जाधव, गोरेगाव कोमसापचे उपाध्यक्ष सुधीर नागले उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते मिलिंद टिपणीस, निवृत्त विस्तार अधिकारी अनिल जाधव, कोमसाप महाड सदस्या प्रिया शहा, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी गोपाळ कांबळे, बौ पं समिती महाडचे कार्यवाह सखाराम जाधव, निवृत्त मुख्याध्यापक अनंत कांबळे यांच्यासह अनेक काव्यरसिक प्रांगणात उपस्थित होते.

या कवी संमेलनात सम्यक निकम, प्रवीण निकम, गौरव मोरे, प्रतीक्षा नगरकर, मारुती सकपाळ, दीपक पाटील, गीतांजली साळवी, दीपक सकपाळ, किरण मोरे, रीना पाटेकर, नरेश साळवी, अभिजित पाटेकर, सुधीर नागले, गंगाधर साळवी, नागेश नायडू, प्रकाश मेथा, प्रकाश स्वामी जंगम, संगीता कांबळे, प्रा.दीपक क्षीरसागर, भूषण भगत, मनीषा पवनारकर, विनोद जाधव, बाळासाहेब दहिफळे या २३ कवी/कवयित्रीनी सहभाग घेतला.

सर्वांच्या कविता खूप दर्जेदार झाल्या.बालकवी सम्यक निकम आणि गौरव मोरे यांच्या कवितेला उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रकाश स्वामी यांनी शिवरायांची गायलेली आरती लोकांच्या पसंतीस उतरली. पोलादपूर, महाड आणि गोरेगाव येथून कवींनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here