@maharashtracity
मुंबई: मुंबईत बुधवारी जसलोक हॉस्पिटलमध्ये (Jaslok Hospital) अवयदान (organ donation) करण्यात आले. नवीन वर्षातील मुंबईतील हे सहावे अवयवदान असून फेब्रुवारी महिन्यातील पहिले अवयवदान आहे. बुधवारी ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांने (senior citizen) अवयवदान केल्याने तिघांना जीवनदान मिळाले असल्याची माहिती मुंबई विभागीय अवयवदान व अवयवप्रत्यारोपण समितीकडून सांगण्यात आले.
एका रुग्णाला मेंदूमृत घोषित करण्यात आल्यानंतर कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. झेडटीसीसीच्या (ZTCC) मार्गदर्शक सुचनांनुसार यकृत (lever) आणि दोन्ही मूत्रपिंडाचे (kidney) वितरण करण्यात आले आहे. ज्यातून तिघांचा जीव वाचवण्यात मदत होणार आहे, असे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले आहे.
जानेवारी महिन्यात पाच यशस्वी अवयवदान झाले होते. फेब्रुवारी महिन्यातील या अवयव दानामुळे ही संख्या ६ वर पोहोचली आहे.