@maharashtracity

मुंबई: कुर्ला (प.) येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयाच्या (Bhabha Hospital) छतावर अँटीना काढण्यासाठी चढलेल्या कामगाराचा अचानक तोल गेल्याने खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे रूग्णालय परिसरात खळबळ उडाली.

मृत कामगाराचे नाव सागर कुमार (२८) असल्याचे समजते. याप्रकरणी रूग्णालय प्रशासन व स्थानिक पोलिसांकडून घटनाप्रकाराची चौकशी सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुर्ला भाभा हे पालिकेचे रुग्णालय कुर्ला व नजीकच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी खूपच उपयुक्त, असे रूग्णालय आहे. या रुग्णालयात दिवस- रात्र रुग्णांची ये – जा सुरूच असते. या रुग्णालयात सध्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या (control room) माध्यमातून अत्याधुनिक वायरलेस सिस्टम (wireless system) कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे.

सोमवारी नेहमीप्रमाणे रुग्णालयाचे कामकाज सुरू असताना या रुग्णालयाच्या छतावरील भागात अँटिना काढण्यासाठी चढलेला सागर कुमार हा कामगार काम करीत होता. त्याचा अचानक तोल गेल्याने तेथून तो थेट खाली पडल्याने गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here