@maharashtracity

काळजी घेण्याचे बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सचे आवाहन

मुंबई: मुंबईत १९ डिसेंबर ते ३ जानेवारी कालवधीत १० ते १९ वयोगटातील ३,१४१ मुलांना कोरोनाची लागण झाली. या कालाधीत रोज १९६ मुले बाधित असल्याचे प्रमाण सांगते. यातून मुलांमध्ये संसर्ग प्रमाण कमी (less infection in children) असल्याचे बालरोग तज्ज्ञ कोरोना टास्क फोर्स समिती सांगते. मात्र त्याच वेळी तिसऱ्या लाटेत कुटुंबातील बाधित होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मोठ्यांनीच कोविड नियम पाळणे गरजेचे असल्याचे बालरोग तज्ज्ञ आवाहन करत आहेत.

दरम्यान, पालिकेच्या सायन (Sion Hospital), केईएम (KEM Hospital), नायर (Nair Hospital) आणि कूपर (Cooper Hospital) या प्रमुख रुग्णालयामध्ये मुलांसाठी ५० खाटा (Beds) राखीव ठेवण्यात आल्या असून यातील बहुतांश खाटा रिकाम्या असल्याची माहिती पालिका रुग्णालयांचे संचालक डाॅ. रमेश भारमल यांनी दिली.

मुंबईत ३ जानेवारीपर्यंत कोरोनाची बाधा (corona patients in Mumbai) झालेल्या ० ते १९ वयोगटातील ५६ हजार ७३३ मुलांचा समावेश असल्याची आकडेवारी समोर येत आहे. याचा अर्थ एकूण बालकांच्या लोकसंख्येत आठ टक्के बालकांना बाधा झाली आहे. हे प्रमाण कमी असले तरीही देखील कोविड संसर्गाचे प्रमाण पाहता लहान मुलांची काळजी घेणे अधिक गरजेचे असल्याचे बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्सचे (Task Force) तज्ज्ञ सुचना करताना दिसतात.

१९ डिसेंबर ते ३ जानेवारी या १६ दिवसांत कोरोना बाधा झालेल्या ० ते ९ वयातील मुले ५ टक्के असून १० ते १९ वयातील मुले ८ टक्के असल्याचे सांगण्यात आले. वेगाने फैलावणाऱ्या कोरोना संसर्गातही मुलांवर कमी परिणाम दिसून येत आहे. शिवाय मुलांमध्ये कोरोना मृत्यू नोंद कमी असल्याचे दिसून येत आहे.

यावर बोलताना बाल रोग तज्ज्ञ कोरोना टास्क फोर्सचे डाॅ. मोहन जोशी यांनी सांगितले की, सध्या संसर्ग असला तरीही देखील हा विषाणू सर्दी खोकल्याचा त्रास असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भीतीदायक अशी स्थिती नाही. मात्र ० ते १५ वयोगटाचे लसीकरण झाले नसल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क, गर्दीत न मिसळणे अशा कोरोनाचे आवश्यक वर्तणूकीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here